खडकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : चार वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : फेसबुकद्वारे ओळख करून विश्वास संपादन केला. दिल्ली येथे कस्टमद्वारे गिफ्ट आले असून, ते सोडविण्यासाठी आणि वेगवेगळ्या अकाउंटवर पैसे भरावया सांगून २९ लाख ८८ हजार ५०० रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी खडकी पोलीस स्टेशनमध्ये भाऊ पाटील रोड, खडकी येथील ३७ वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी महिलेची फेसबुकद्वारे ओळख झाली. ओळखीतून विश्वास संपादन करीत फिर्यादीने फेसबुक प्रोफाईलधारक मोबाईलधारकाने गिफ्ट पाठविले आहे. ते दिल्ली येथे आले असून, ते सोडविण्यासाठी पैशांची गरज असल्याचे सांगितले. दरम्यान आरोपीने चार वेगवेगळ्या बँक अकाउंटवर पैसे भरावयास लावले. याद्वारे २९ लाख ८८ हजार ५०० रुपये फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. पुढील तपास खडकी पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस निरीक्षिका संगीता जाधव करीत आहेत.
