महिला डॉक्टरच्या लैंगिक संबंधाबाबत व्हाट्सअॅपवर मॅसेज करणाऱ्याविरुद्ध गुन्हा
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : महिला सहकारी डॉक्टरांविषयी अफवा पसरवुन त्यांच्याविषयी व्हॉटसअॅप ग्रुपवर मेसेज करुन त्यांच्या मोबाईलवर अश्लिल मेसेज करुन विनयभंग करणार्या डॉक्टराला पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
डॉ. सतीश कोळसुरे असे अटक केलेल्या डॉक्टराचे नाव आहे. कामावर असतानाच डॉक्टरला अटक केल्याने परिसरात मोठी चर्चा सुरु झाली. याबाबत महिला डॉक्टरने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, क्षेत्रीय कार्यालय स्तरावरील एका व्हॉटसअॅप ग्रुपवर एका वरिष्ठ महिला वैद्यकीय अधिकारी यांच्या बद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान या डॉक्टरांनी केले होते. याबाबत त्यांनी एका आरोग्य निरीक्षक दर्जाच्या अधिकारी यांना देखील अश्लील शिवीगाळ व धमकी दिली होती. तसेच ता 4 ऑक्टोबर रोजी या डॉक्टर महिलेला मनात लज्जा उत्पन्न होईल असे आक्षेपार्ह विधान अनेकदा त्यांच्यातील व्हॉटसअॅप ग्रुपवर केले.
पुणे महानगरपालिकेच्या सेवेत असलेल्या काही महिला डॉक्टर व नर्स या ग्रुपच्या सदस्या आहेत. त्या सर्वांनीच हा मेसेज पहिला व त्या सर्वांच्याच मनात याबद्दल लज्जा उत्पन्न होईल असे ते वक्तव्य होते. एका वरिष्ठ डॉक्टरांच्या बद्दल असे जाहीर घाणेरडे जाहीर वक्तव्य केल्याप्रकरणी डॉक्टराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुरूवारी दुपारी त्यांना त्यांच्या ओपीडीत असताना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. दुपारी त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना ३ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. गुन्ह्याचा अधिक तपास महिला पोलिस निरीक्षक करीत आहेत.















