पुण्याजवळील घटना : लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताविरोधी फिर्याद
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : शिंदवणे घाटातील रस्त्यालगतच्या झुडपामध्ये स्त्री जातीचे दोन दिवसांचे अर्भक आढळून आले आहे. गुरुवारी सायंकाळी येथून दुचाकीवरून जाणाऱ्या एकाने पोलिसांना ही माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार अजित सणस यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, शिंदवणे गावातून घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या झुडपात अर्भक ठेवले होते. गुरुवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास येथून एकजण दुचाकीवरून जात होता. त्यावेळी त्याला रडण्याचा आवाज आल्याने त्याने गाडी थांबवून पाहीले असता अर्भक आढळून आले. त्याची माहिती पोलीस ठाण्याला कळविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून अर्भक बालकल्याण समितीकडे सोपविण्यात आले आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सदाशिव गायकवाड करीत आहेत.















