दोघांवर गुन्हा : उरुळी कांचनमधील आश्रम रोडवरील एस.बी.आय. बँकेसमोरील घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये त्या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना उरुळी कांचनमधील आश्रम रोडवरील एस.बी.आय. बँकेसमोर सोमवार दि. ११ ऑक्टोबर २०२१ रात्री पावणेआठच्या सुमारास घडली.
उरुळी कांचन (ता. हवेली, जि.पुणे) येथील ४६ वर्षीय महिलेने लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार मोटारसायकलवरील दोन अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, उरुळी कांचनमधील आश्रम रोड, एस. बी. आय. बँकेसमोरून फिर्यादी पायी जात होते. त्यावेळी दुचाकीवरून दोघेजण जवळ आले आणि गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसका मारून चोरून नेले. लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक डी. के. पवार पुढील तपास करीत आहेत.
