लोणी काळभोर पोलिसांची कारवाई : ३४ हजारांचा मुद्देमाल नष्ट
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : अवैध सुरू असलेल्या हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर लोणीकाळभोर पोलिसांनी कारवाई करीत सुमारे ३४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट करून एकावर गुन्हा दाखल केला आहे.
लोणी काळभोरमधील राहिंजवस्ती येथे मुळा-मुठा नदीकाठी गावठी ( हातभट्टी ) दारूभट्टी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वीस हजार रुपये किमतीचे दोन हजार लिटरचे कच्चे रसायन, १४ हजार ४०० रुपयांचे ३५ लिटरचे १२ कॅन असा एकूण ३४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जागीच नष्ट केला. या प्रकरणी राधेश्याम हरिराम प्रजापती याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक सुभाष काळे, सहायक पोलीस निरीक्षक चिवडशेट्टी, पोलीस हवालदार विजय जाधव, सुनील शिंदे, श्रीनाथ चव्हाण, नागलोत आणि वीर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
