लोणी पोलिसांत तक्रार : वडकी-सासवड रस्त्यावर व्यंकीज कंपनीसमोर घडली घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : अज्ञात रिक्षा धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना व्यंकीज कंपनीसमोर वडकी-सासवड रस्त्यावरील साईडपट्टीवरून बसथांब्याकडे जाणाऱ्या साईडपट्टीवर घडला.
प्रदीप चंद्रकांत बडदे (वय ३३, रा. सोपाननगर, सासवड, पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी संजय भुजबळ (वय ५३, रा. सासवड, गोरक आळी, ता. पुरंदर, जि. पुणे यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात रिक्षाचालकावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी प्रदीप चंद्रकांत बडदे याच्याबरोबर वडकी-सासवड रस्त्याने साईडपट्टीवरून पायी जात होते. त्यावेळी अज्ञात रिक्षाची जोरदार धडक बसून अपघात झाला. या अपघातात बडदे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर बिडवे करीत आहेत.















