सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त : गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-२ ची कारवाई
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यात घातक शस्त्र विक्रीसाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीकडून कोयते, चॉपर आणि चाकू असा एकूण सहा हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई पुण्यातील ताडीवाला रोडवर केली.
अवतारसिंग कांचनसिंग जुनी (वय-42 रा. राजनगर, ओटा स्किम, सेक्टर नं. 22, निगडी) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. आरोपीवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथक-२ चे पोलीस अंमलदार शैलेश सुर्वे यांना सराईत गुन्हेगार ताडीवाला रोडवरील हॉटेल नुर मंजील जवळ घातक शस्त्रांची विक्री करण्यासाठी आला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या मोपेड (एमएच 14 एचएफ 9828) च्या डिकीची तपासणी केली. त्यावेळी कापडी पिशीवत ठवलेले 2 कोयते, 4 चॉपर, 4 चाकू असे 10 धारदार शस्त्रे आढळून आली. त्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक- 2 चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, पोलीस अंमलदार शैलेश सुर्वे, प्रदिप शितोळे, विनोद साळूंके, विजय गुरव, राहुल उत्तरकर, सचिन अहिवळे, संग्राम शिनगारे, सौदोबा भोजराव, प्रदिप गाडे, अमोल पिलाने, चेतन शिरोळकर, मोहन येलपल्ले, महिला पोलीस अंमलदार रुपाली कर्णवर, आशा कोळेकर यांच्या पथकाने केली.














