राजू कदम : कात्रज-संतोषनगर भागातील ९०० मुलांनी नोंदवला सहभाग
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : भारत देश हे सण आणि उत्सवांची भूमी आहे असे मानले, तरी वावगे ठरणार नाही. भारतात साजरे केले जाणारे विविध सण व उत्सव ही त्याची समृद्ध संस्कृती आणि परंपरेचे प्रतिबिंब दर्शवितात. तसे पाहिले तर बरेच भारतीय सण आणि उत्सव असून मकरसंक्रातीला पतंगोत्सव हा मुलांच्या आवडीचा असल्याचे मत राजू कदम यांनी व्यक्त केले.
कदम म्हणाले की, मकर संक्रांतीच्या निमित्ताने पतंग उडविण्याची मौज बालगोपालांसह मोठी मंडळीही त्याचा आनंद लुटतात. दरवर्षी प्रमाणे यावर्षी कात्रज, संतोषनगर भागात मोफत पतंग बाळ गोपाळांना दिले. बाळगोपाळांनी पतंग घेऊन आनंद व्यक्त केला. पतंगोत्सवामध्ये ९०० मुलांनी सहभाग घेतला होता. यावेळी चिनी मांजा ऐवजी देशी दोरीचा वापर केला होता.
पतंग उडवताना लहान मुलासोबत पालकांनी थांबावे, इमारती लगत गेलेल्या विद्युत वाहिन्यांची खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या होत्या. पालकांनी कोरोनाचे नियम पाळून पतंगोत्सवाचा आनंद लुटल्याचे त्यांनी सांगितले.
