विमानतळ पोलिसांत फिर्याद : नवीन एअरपोर्ट रोड लोहगाव येथील घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : सिक्युरिटी गार्डला धमकावून अतिक्रमण करीत जागा बळकाविण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. नवीन एअरपोर्ट रोडवर लोहगाव येथील स.नं.२३३-ब येथे एक डिसेंबर २०२१ रोजी ही घटना घडली.
श्रीकांत मोरजकर (वय ४२, रा. वडगावशेरी, पुणे) यांनी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार सात-आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीच्या कंपनीची लोहगाव स.नं.२३३-ब, नवीन एअरपोर्ट रोड, विमानगर येथे पाच-सहा गुंठे मिळत आहे. सात-आठ आरोपींनी या मिळकतीवर ताबा करण्याच्या इराद्याने सिक्युरिटी गार्ड यांना धमकावून त्या जागेवर अतिक्रमण करून जागा बळकावली आहे. विमानतळ पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. लहाने पुढील तपास करीत आहेत.
