विश्रामबाग पोलिसांत फिर्याद : अनोळखी मोबाईल व खातेधारकावर गुन्हा
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : फायनान्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगून पर्सनल लोन मंजूर करून देण्याच्या आमिषाने सहा लाख ३६ हजार ११६ रुपयांना गंडा घालणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १२ मार्च ते डिसेंबर २०२० दरम्यान घडली.
विशाल भागवत (वय ३८, रा. राजेंद्रनगर, पुणे) यांनी विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात मोबाईलधारक व खातेधारकावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीला अनोळखी मोबाईलधारक व खातेधारक यांनी फायनान्स कंपनीतून बोलत असून, तुम्हाला पर्सलन लोन मंजूर करून देतो, त्यासाठी व्हॉट्सॲप बँकेची कागदपत्रे घेतली. लोनची प्रोसेसिंग व चार्जेस फी अशी वेगवेगळी कारणे सांगून आरोपीला बँकेच्या खात्यावर पैसे भरण्यास सांगून सहा लाख ३६ हजार ११६ रुपयांना गंडा घातला. विश्रामबाग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने पुढील तपास करीत आहेत.
