देहूरोड पोलिसांत फिर्याद : शिवीगाळ करीत जीवे मारण्याची दिली धमकी
महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क
पुणे : लग्नाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार करणाऱ्यावर पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रावेत आणि वाकड येथे 16 नोव्हेंबर 2021 ते 21 मार्च 2022 या कालावधीत घडली आहे.
देहूरोड पोलीस ठाण्यात पीडित महिलेने मंगळवारी (दि.5) फिर्याद दिली आहे. महिलेच्या तक्रारीवरून रावेत येथे राहणाऱ्या 30 वर्षाच्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी महिला आणि आरोपी हे एकमेकांचे मित्र आहेत. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने महिलेवर बलात्कार केला. तसेच, फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पन्हाळे करीत आहेत.














