महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : आनंद दरबार कात्रज दत्तनगर येथे दि.२६ डिसेंबर रोजी मेवाड भूषण प.पू.प्रतापमलजी म.सा. यांच्या संयम शताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. नव्याने सुरू होत असलेल्या आनंद दरबार संस्था संचालित गुरु आनंद मेडिकल सेंटरच्या इमारतीस महाराज साहेबांचे पदस्पर्श लागले.
यावेळी गुरु गुणानुवाद धर्मसभेत उपस्थितांना संबोधित करताना प.पू. गौतममुनीजी म. सा. म्हणाले, आपल्या जीवनावर तीन जणांचे अनंत उपकार आहेत. सर्वात पहिले आई वडील ज्यांनी आपल्याला हे जग दाखवले, दुसरे म्हणजे आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवणारे कलाकार आणि तिसरे आपले जीवन घडवणारे शिल्पकार सदगुरु होय. मेवाड़ भूषण प. पू. प्रतापमलजी म. सा. उपाध्याय प. पू. श्री. गौतममुनीजी म. सा, प. पू. अर्चनाश्रीजी म. सा, प. पू. कुमुलताजी म. सा., प. पू. सौरभसुदाजी म. सा, प. पू. चारुप्रज्ञाजी म. सा. आदी ठाणा यांच्या पावन सानिध्यात संपन्न झाला. अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी बोलताना ते म्हणाले, बहात्तर वर्षाच्या आयु मध्ये वयाच्या चौदव्या वर्षी संयम ग्रहण केले संयम च्या आठावन वर्षा मध्ये मुखार विंदातुन शंभरहून अधिक मुमुक्षु आत्मना संयम चा मार्ग दिला असे महान संताची संयम शताब्दी करण्याचे सौभाग्य श्री संघास लाभले अश्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
तसेच गुरु आनंद मेडिकल सेंटर व विविध सामाजिक कार्याची माहिती दिली. लवकरच सेंटर सुरू करण्याचे आश्वासन दिले. या वेळी मार्गशीर्ष पौर्णिमा निमित्त निर्मला मुथ्था खडकी बाजार, मायाताई कटारिया कोंढवा प्रभावना चे लाभार्थी ठरले तसेच गौतमप्रसादीचा लाभ देखील सर्व भक्तांनी घेतला.
आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले सर्व सभासदानी योगदान दिले कार्यक्रमाचे आभार सौरभ धोका यांनी मानले.
















