मुस्लिम बांधवानी केले स्वागत
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल
भुम : परांडा शहरासह तालुक्यातील मुस्लीम बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘हजरत ख्वाजा बदरुद्दीन चिस्ती शहीद रहेमतुल्ला आले’ यांच्या मोठ्या उत्साहात सुरू होत असलेल्या ७०४ व्या उरुसाची परंपरे नुसार होत असलेली सुरुवात डॉ. राहुल घुले यांच्या हस्ते करण्यात आली.
डॉ.राहुल घुले यांच्या हस्ते दर्गाहचे मुजावर युनुस आलम सिद्दीकी यांच्या घरापासून डोक्यावर संदल घेऊन मानाच्या घोड्यावर फुलांची चादर चढवून उरुसाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शहरासह तालुक्यातील शेकडो मुस्लीम बंधू भगिनी उपस्थित होत्या.
