पुणे सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारीवाल यांची फेक प्रोफाइल बनवून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बनावट सिम कार्ड वापरून फसवणूकीचा प्रयत्न झाला असून या प्रकरणी प्रकाश धारीवाल यांनी पुणे सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे.
यावेळी बोलताना प्रकाश धारिवाल यांनी सांगितले कि, माझ्या नावाने बनावट सिम कार्ड घेऊन लोकांची फसवणूक करणाऱ्यावर कारवाई करावी.
प्रकाश धारीवाल (रा. माणिकचंद हाऊस,१००-१०१ डी केनडी रोड) यांनी या मागणीचे निवेदन सायबर क्राईम पोलिसांना दिले आहे. प्रकाश धारीवाल यांच्या नावाने काही लोकांना फोन करून पैसे मागितल्याच्या तक्रारी प्रकाश धारीवाल यांच्याकडे आल्या. त्यांचे व्यावसायिक, सामाजिक, क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून भारतभर संबंध आहेत. या संबंधांचा कोणी दुरुपयोग करुन लोकांची फसवणूक केल्याचा दाट संशय देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
त्यामुळे त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करून ९९१३२१५९७६ या क्रमांकाचा शोध घेऊन तो नंबर कोणाच्या नावे आहे? तो नंबर कोणी आणि कुठे रजिस्टर केला आहे? या व्यक्तीने माझ्या नावाने काही ईमेल अकाऊंट व सोशल मिडीयाचे अकाऊंट वेगळ्या नावाने उघडले नाही ना याची खातरजमा करून या व्यक्तीला कायद्यानुसार कडक शासन करण्याची मागणी केली आहे. तसेच हा नंबर आमच्या परिवाराशी संबंधित नसून त्या नंबरवरून कोणाची काही फसवणूक झाली असल्यास त्याची जबाबदारी माझी रहाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
