वारजे माळवाडी पोलीसांची कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : दोन गटात मारहाण करणाऱ्या टोळीमधील सराईत गुन्हेगारांना गजाआड करण्यात वारजे माळवाडी पोलीसांना यश आले आहे.
अमरजित सिंग, (वय २३ वर्षे) रोहन चव्हाण, (वय- २५ वर्षे, दोघे रा. अचानकचौक, रामनगर वारजे), तसेच रामनगर शिवाजी चौकातील टोळीचे धनंजय उर्फ धनाजी सुर्यवंशी, (वय २९ वर्षे, रा. गणेशपुरी सोसायटी रामनगर) हेमंत ऊर्फ विकी काळे, (वय २६ वर्षे) युवराज काळे, (वय २४ वर्षे) अक्षय ऊर्फ अवधूत यादव, (वय- २९ वर्षे) कुंदन ऊर्फ सोन्या गायकवाड,(वय २६ वर्षे) संजय ऊर्फ बाबू चव्हाण, (वय- २० वर्षे सर्व रा. शिवाजी चौक, रामनगर वारजे) यांना दाखल गुन्ह्यात अटक केली आहे.
यामध्ये ३ अल्पवयीन बालकांचा देखील समावेश असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. रामनगर वारजे भागातील अचानक चौक व शिवाजी चौक मधील सराईत गुन्हेगारांमध्ये पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एकमेकांना धारदार हत्याराने, लाकडी बांबूने व विटांनी हाणमारी झाली.
तेथे पार्क केलेल्या गाड्यांची तोडफोड करून नुकसान करण्यात आले. परिसरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करण्यात आले. हाणामारीमध्ये रामनगर शिवाजी चौकातील टोळीचा आकाश दिवेकर (वय २८ वर्षे) हा जबर जखमी झाला.
त्याचा बदला घेण्याकरीता रामनगर शिवाजी चौकातील टोळीने रामनगर अचानक चौकातील टोळीचा सागर कांबळे याच्यावर जिवे ठार मारण्याच्या हेतूने हल्ला केला. दोन्ही टोळींविरुध्द वारजे माळवाडी पोलीसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दाखल गुन्ह्यांचा तपास सुरु असताना दोन्ही टोळींमधील सराईत गुन्हेगार गुन्हा करून मध्यरात्रीनंतर पसार झाले होते. वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने मध्यरात्री नंतर या गुन्हेगारांचा शोध सुरु केला.
तपास पथकाने अवघ्या ४ तासात माहितीदारांच्या मदतीने दोन्ही टोळी मधील आरोपींना शिताफिने ताब्यात घेतले. त्यामध्ये रामनगर अचानक चौकातील टोळीचे व इतर पाहिजे आरोपींचा शोध सुरु आहे.
दाखल गुन्ह्यांचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे व पोलीस उप निरीक्षक अनिता दुगांवकर हे करत आहेत. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग, मिमराव टेळे, यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन पाटील, तपास पथक प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे व त्यांच्या पथकातील पोलिस अंमलदार प्रदिप शेलार, भुजंग इंगळे, विजय भुरुक, श्रीकांत भांगरे, संभाजी दराडे, विक्रम खिलारी, अजय कामठे, सत्यजित लोंढे, गणेश कर्चे, किशोर नेवसे व योगेश वाघ यांनी केलेली आहे.















