महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी : श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय, बार्शी येथे वि.वा.शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस शिक्षण अधिकारी सोमनाथ वैद्य यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या वेळी वाचनालयाचे अध्यक्ष किशोर श्रीश्रीमाळ, मानद सचिव आनंद पुनमिया, संचालक धिरज कुंकूलोळ, प्रमोद भंडारी, वाचनालयाचे वाचक वर्ग अविनाश केसकर,मधुकर गोणेगावकर, अनिल मुसळे, युनिस बागवान व सभासद उपस्थित होते.
वाचनालयाचे ग्रंथपाल-सुरेश यादव सहा. ग्रंथपाल पल्लवी तौर, क्लार्क – विराज पतंगे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक वाचनालयाचे संचालक प्रमोद भंडारी यांनी केले. ग्रंथपाल सुरेश यादव यांनी आभार मानले.

 
			

















