महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल
भूम : भूम तालुक्यात पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी रीतीने राबविण्यात आली आहे.
ग्रामीण व शहरी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने ‘दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी’ हे घोषवाक्य घेण्यात आले.
हे घोषवाक्य घेऊन ३ मार्च रोजी भागातील ५ वर्षापर्यंतच्या बालकांना लसीकरण केंद्रावरून पोलिओची लस देण्यात आली.तालुक्यातील एकही बालक पोलिओच्या डोस पासून वंचित राहू नये यासाठी फिरती पथके आणि रात्रीची पथकेही कार्यरत केली आहेत.
भूम शहरामध्ये ओंकार चौक, रवींद्र हायस्कुल, कसबा पेठ, इंदिरा नगर, साई हॉस्पिटल, बस स्टॅन्ड, कल्याण नगर भागात जास्तीची केंद्रे उभारली होती. वीटभट्टी, वस्ती, वाड्या, ऊस तोडणी मजुरांचे पाल आदी ठिकाणी जाऊन पोलिओचे लसीकरण करण्यासाठी शेकडो कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.
आरोग्य विभागाकडून करण्यात आलेल्या पाच वर्षाखालील मुला-मुलींना पोलिओची लस देण्याच्या आवाहनाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे. यावेळी डॉ. गोसावी, एन. एम. अंभुरे, एम. एन. जुबेर शेख उपस्थित होते.
प्लस पोलिओ मोहीम निमित्त लस देताना मा नगराध्यक्ष संजय गाढवे, बालाजी माळी, धनंजय मस्कार आदी दिसत आहेत.
