कोंढवा पोलीसांनी भामटयाला घेतले ताब्यात
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : लष्करात नोकरी लावण्याचे आमिष दाखवुन अनेक लोकांना फसवणाऱ्या भामटयाला कोंढवा पोलीस तपास पथक व साऊथ कमान मिलेटरी इंटेलिजन्स यांनी संयुक्त कारवाई कारवाई करुन ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी विनायक कडाळे (रा. लुल्लानगर चौकातील सपना पावभाजी सेंटर जवळील हिल व्हुव सोसायटी) याला अटक करण्यात आली आहे.
कोंढवा भागाच्या लगत लष्कराच्या कंमाड हॉस्पिटल येथुन अकाऊंन्ट (सिव्हिल सर्व्हिस) या पदावरुन स्वइच्छा सेवानिवृत्त घेतलेले विनायक कडाळे यांनी कमांड हॉस्पीटल व लष्करात विविध पदावर नोकरी लावून देतो असे आमिष दाखविले. व फिर्यादी व त्यांच्या परिचयाच्या लोकांना व नातेवाईकांकडुन १३ लाख ५० हजार रुपये रक्कम घेऊन त्याची फसवणुक केली.
त्याबाबत विनायक कडाळे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा केल्यानंतर आरोपी हा त्याचा रहाता पत्ता बदलुन दुस-या ठिकाणी राहण्यास गेला होता. त्याच्याबाबत माहिती साऊथ कमान मिलेटरी इंटेलिजेन्ट व कोंढवा तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, विकास बाबर व तपास पथक वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक गुन्हे मानसिग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेत होते.
त्यात तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलीस अमलदार विकास मरगळे, रोहित पाटील व साऊथ कमान मिलेटरी इंटेलिजंन्ट यांना माहिती प्राप्त झाली की, आरोपी लुल्लानगर चौकातील सपना पावभाजी सेंटर जवळील हिल व्ह्यू सोसायटीमध्ये राहत आहे. तो घरातुन बाहेर जाताना स्वत:चे अस्तित्व लपवुन वावरत असतो.
या माहितीच्या अनुषंगाने हिल व्ह्यू सोसायटीच्या बाहेर लष्कर पथक व कोंढवा पोलिस ठाणे तपास पथक सोसायटीच्या आजुबाजुला वेशांतर करुन सापळा रचुन थांबले. आरोपी तोंडाला कापड बांधुन घरी जात असताना दिसला. आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीने आणखी काही तरुणांना बेरोजगारीचा फायदा घेऊन नोकरीचे आमिष दाखवुन फसविले असल्याची माहिती प्राप्त होत आहे.
अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विकास बाबर हे करित आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त परि.५ आर राजा, सहायक पोलीस आयुक्त वानवडी विभाग गणेश इंगळे, यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेश पाटील, पोलिस अंमलदार अमोल हिरवे, राहुल वंजारी, अभिजीत रत्नपारखी, जयदेव भोसले, राहुल थोरात, सुहास मोरे, अभिजीत जाधव, आशिष गरुड, अक्षय शेंडगे, शशांक खाडे यांनी केली आहे.
