वानवडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
कोंढवा-सोलापूर रस्त्यावर टोल पावती फाडण्याच्या बहाण्याने दुचाकीवरील दोघे जवळ आले. दोघांनी मारहाण करीत १५ हजार रुपये आणि पाकिट व कागदपत्रे चोरून नेली. ही घटना वानवडीतील शिंदेछत्री टोलनाक्याजवळ २ सप्टेंबर २०२१ रोजी पहाटे पावणे सहा वाजता घडली.
याप्रकरणी साहेब अन्सारी (वय १९, रा. कोंढवा, पुणे) यांनी वानवडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोटारसायकलवरील अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी कोंढवा-सोलापूर रस्त्यावर फिर्यादी स्वतःचे वाहन घेऊन जात होते. त्यावेळी टोल पावती फाडण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून दोघे अनोळखी जवळ आले आणि त्यांच्या कडून रोख १५ हजार आणि पाकिट व कागदपत्रे जबरस्तीने चोरून नेले. पुढील तपास सहायक पोलीस फौजदार एम. ए. इनामदार करीत आहेत.














