पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
विमाननगर रोडवर दोन पादचाऱ्यांच्या हातातील मोबाईल हिसका मारून चोरून नेला. ही घटना चॉप स्टीक मलाबार हॉटेलसमोर ३ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास घडली.
याप्रकरणी २२ वर्षीय महिलेने विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी महिला छोटा भाऊ व चुलत बहिणीसोबत पायी जात होत्या. त्यावेळी मोटारसायकलवरील चोरट्यांनी महिलेच्या हातातील २५ हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसका मारून चोरून नेला.
त्यानंतर सईद मोहम्मद (वय ३० रा. खराडी) यांचाही फिनिक्स मॉलच्या पाठीमागील रोडवरून मोबाईल चोरून नेला. विमाननगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सचिन जाधव पुढील तपास करीत आहेत.
