महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल
भूम : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या हयातीतील भारतातील सर्वात प्रतिभाशाली व सर्वाधिक उच्चविद्याविभूषित व्यक्ती होते असे प्रतिपादन शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परांडा येथील प्राध्यापक डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी केले.
शंकरराव पाटील महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. चंदनशिवे म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या हयातीतील सर्वात प्रतिभाषाली व सर्वाधिक उच्चविद्या विभूषित व्यक्ती होते.
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकृष्ण चंदनशिव उपस्थित होते. व्यासपीठावर प्राणीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. नितीन पडवळ, आय. क्यू. एसी.च्या चेअरमन डॉ. अनुराधा जगदाळे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमधिकारी डॉ नितीन पडवळ, प्रा डॉ नंदू जगदाळे व प्रा दीप्ती गिरी आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शितल अलगुंडे यांनी केले होते. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चंदनशिवे पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची घटना लिहिली आणि या राज्य घटनेमुळे देशातील 18 पगड जातीला न्याय दिला. वंचितांना जगण्याचा अधिकार दिला. त्यांनी शैक्षणिक सामाजिक राजकीय आर्थिक शेती विषयक महिला विषयक विभागामध्ये उल्लेखनीय कार्य करून अनमोल योगदान दिले.
अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. श्रीकृष्ण चंदनशिव म्हणाले, डॉ बाबासाहेब आंबेडकर हे महान नेते होते. त्यांनी या देशाची घटना दिल्यामुळे या देशातील अनेक जाती धर्माचे लोक आनंदाने जगत आहेत. बाबासाहेबांनी अमेरिकेसारख्या देशात जाऊन मोठमोठ्या पदव्या संपादन केल्या ही भारतीय म्हणून आपल्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. सूत्रसंचालन डॉ. गौतम तिजारे यांनी केले तर आभार डॉ. राजश्री तावरे यांनी मानले.