महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल
भूम : कसबा येथील श्रीराम मंदीरात श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी भाविकांची मोठी गर्दी दिसुन आली. सकाळी श्रीरामाच्या मुर्तीस पवमान अभिषेक महापुजा यानंतर सकाळी १० ते १२ या वेळेत बार्शी येथील नारदिय किर्तनकार सुनिल बडवे यांचे किर्तन होवुन फुले उधळून जोरदार अतिषबाजी करत जन्मसोहळा संपन्न झाला.
यानंतर श्रीरामाला न्हाउ घालण्यात आले यानंतर पाळण्यात ठेवुन महिलांनी पाळणा म्हणला. यानंतर रावसाहेब बुरटे यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली. यानंतर प्रसाद म्हणुन सुंठवडा पेढे वाटप करण्यात आले.
यावेळी नारदिय किर्तनकार सुनिल बडवे यांच्या किर्तनासाठी पेटीसाथ मुकूंद महाराज बेलसरे व तबलासाथ नंदकुमार देशमुख यांनी केली. संध्याकाळी श्रीरामाची कसबा विभागातून बँन्ड पथकाच्या निनादात श्रीरामाच्या जयघोषात पालखी काढण्यात आली.
आज सकाळपासुनच दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. हा उत्सव दि २४ एप्रील पर्यंत सुरु राहणार असून या कालावधीत नारदिय किर्तन व वारकरी सांप्रदाईक किर्तन व संगीत मैफलीचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी श्रीराम मंदीर संस्थान विषेश परिश्रम घेत आहेत जन्म सोहळ्यानिमित्त पोलीस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी यांनी मंदीराला भेट देवुन चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.