पत्नीशी अनैतिक संबंध : बाणेरमधील घटना , अंबरनाथ मध्ये केले जेरबंद
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून बाणेर येथे मित्राच्या डोक्यात दगड घालून खून करुन पसार झालेल्या आरोपीस पकडण्यात यश आले आहे. २४ तासाच्या आत त्याला चतुःश्रृंगी पोलिसांनी अंबरनाथ येथे जेरबंद केले.
चतुःश्रृंगी पोलीस ठाणे हद्दीत नाना विठ्ठल चादर (वय ३६, रा. वाकड) याचा खून झाला होता. आरोप फरार होता. पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे- २, पुणे शहर सतिश गोवेकर यांनी दाखल गुन्हयाचे घटनास्थळास भेट देवून मार्गदर्शन केले.
गुन्हे शाखा, युनिट ४ कडील सर्व अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार दाखल करण्यात आली. आरोपी त्याचा मोबाईल फोन बंद करुन अंबरनाथ (जि. ठाणे) येथे पळुन गेला. आरोपीच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषणावरुन तो फॉरेस्ट नाका, अंबरनाथ, जि. ठाणे येथे असल्याचे निश्चित झाले.
आरोपीस स्थानिक पोलीसांच्या मदतीने फॉरेस्ट नाका, अंबरनाथ येथुन पहाटे ताब्यात घेतले. त्याचे नाव कृष्णाभिमराव सुरोशे (वय ४० वर्षे, रा. पाण्याच्या टाकीजवळ, विठ्ठल रखुमाई मंदीराच्या शेजारी, बालेवाडी गावठाण, पुणे, मुळगांव आनंदवाडी, ता. परतुर, जि. जालना )असे आहे.
आरोपी कृष्णाभिमराव सुरोशे हा फॉरेस्ट नाका, अंबरनाथ, ठाणे येथे राहत होता. काही वर्ष पुर्वी तो घर व रिक्षा विकुन मुरकुटेचाळ, बाणेर, पुणे येथे नोकरी निमित्त कायम स्वरुपी पत्नी व मुले यांचेसह राहण्यास आला होता. घरा शेजारी राहण्यास असलेला नाना विठ्ठल चादर याचेशी त्याची मैत्री झाली.
काही दिवसानंतर आरोपीची पत्नी व नाना चादर यांचे मध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय त्याला आला. तेव्हा पासून आरोपी व त्याचे पत्नीत वाद होत होते. नाना चादर मुळे संसार विस्कळीत झाल्याने आरोपीचे मनामध्ये त्याच्या विषयी नेहमीच राग होता.
७ जून रोजी नाना चादर व त्याचे मित्र असे रामदास धनकुडे यांचे मोकळया जागेत जावुन ताडी, दारु व चिलीम पित बसले होते. त्या नंतर ते घरी निघुन गेले. दि. ०८ जून रोजी पहाटे आरोपीस चिलीम पिण्याची तलप झाल्याने मोटार सायकल घेवून ताडी पिण्यासाठी बसलेल्या ठिकाणी पोहोचला.
तेव्हा नाना चादर हा एकटाच दारुच्या नशेत तेथे झोपलेला दिसला आरोपीने कोणताही विचार न करता तेथे पडलेला मोठा दगड घेवून नाना चादर याच्या डोक्यात घातला व तेथुन दुसऱ्या दिवशी अंबरनाथ येथे तो निघुन गेला होता.
आरोपीला पकडण्याची कामगिरी पोलीस आयुक्त पुणे शहर. अमितेश कुमार, सह. पोलीस आयुक्त, पुणे शहर प्रवीण पवार, अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे शहर, शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त गुन्हे, पुणे शहर अमोल झेंडे. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २ सतिश गोवेकर, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिट ४. गणेश माने, पोलीस उप निरीक्षक प्रदीप पाटील, वैभव मगदुम, पोलीस अंमलदार हरीष मोरे, सारस साळवी, प्रविण भालचिम, अजय गायकवाड, संजय आढारी, वैभव रणपिसे, नागेश सिंहकुंवर, एकनाथ जोशी, विठ्ठल वाव्हळ, भरत गुंडवाड, वैशाली माकडी यांनी केली आहे.