महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : श्री पूना गुजराती बंधू समाज व दि पूना गुजराती केळवणी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने परमार हॉल, आर. सी. एम. स्कूल, दारूवाला पूल येथे समाजातील लोकांसाठी नेत्र तपासणी, चष्मे वाटप तसेच मोतीबिंदू मोफत शस्त्रक्रिया शिबीर आयोजीत करण्यात आले होते.
रविवारी (दि.१६ जून) या शिबिराचे उदघाटन पूना गुजराती केळवणी मंडळचे चेअरमेन राजेश शहा व श्री पूना गुजराती बंधू समाजचे जॉईंट मॅनेजिंग ट्रस्टी नैनेश नंदू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजेंद्र शहा, हरेश शहा, हेमंत मणियार, संदीप शहा, विनोद डेडिया, पंकज डेडिया, केतन कापडिया, हेमा शहा, कृती शहा आदी मान्यवर उपस्थित होते.
या नेत्र तपासणी शिबिरात ३०० व्यक्तींच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १०० लोकांना संस्थेकडून चष्मे वाटप करण्यात आले. तर ३० लोकांना मोतीबिंदू असल्याचे निदान करण्यात आले, त्या सर्वांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया एच व्ही देसाई आय हॉस्पिटल, मोहम्मदवाडी, येथे करण्यात येणार आहेत.
श्री पूना गुजराती बंधू समाज व दि पूना गुजराती केळवणी मंडळ या दोन्ही संस्था शंभर वर्षे जुन्या संस्था असून त्यांच्यामार्फत असे समाजोपयोगी उपक्रम सतत राबवले जातात.