भारती विद्यापीठ पोलिसांची सोलापुर व धाराशीव जिल्हयात कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : मांगडेवाडी येथे खुनाचा प्रयत्न करुन पसार झालेल्या चार आरोपीना भारती विद्यापीठ ठाण्याच्या पोलिसांनी सोलापुर व धाराशीव जिल्हयात कारवाई करत अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मांगडेवाडी येथे खुनाचा प्रयत्न करून काहीजन फरार झाले होते. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे.गुन्हयातील आरोपी निलेश रविंद्र नागटिळक, (वय २१ वर्षे, रा. विघ्नहर्ता अपार्टमेंन्ट, मांगडेवाडी, कात्रज), अथर्व संतोष सुतार, (वय १९ वर्षे, रा. सई रेसीडन्सी, फ्लॅट नंबर ४०८, मांगडेवाडी, कात्रज), सुशिल रमेश शिरसाठ, (वय २०, रा. शिवतीर्थ अपार्टमेंन्ट, फ्लॅट नंबर ०२, मांगडेवाडी, कात्रज, पुणे).अभिजीत ऊर्फ दगडु दिलीप गेजगे, (२० वर्षे, रा. भैरवनाथ मंदीराजवळ, मांगडेवाडी, कात्रज) यांचा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे शोध घेत होते.
पोलीस अंमलदार अवधुत जमदाडे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी यांना खबऱ्या मार्फत बातमी मिळाली होती. फरार आरोपी हे गुन्हा करुन झाल्यानंतर ते पुणे शहरातुन पळून गेले असुन सोलापुर व धाराशीव जिल्हयात फिरत आहेत.
ही माहिती मिळाल्याने सपोनि समीर कदम व स्टाफ यांनी सोलापुर, धाराशीव जिल्हयात जावुन आरोपींचा शोध घेत असताना त्या दरम्यान पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे, सचिन गाडे यांना नमुद आरोपी हे आष्टी, जालना जिल्हयात गेले आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली. त्या माहीती वरुन लागलीच सपोनि समीर कदम व स्टाफ यांनी आष्टी, जालना जिल्हयात जावुन नमुद आरोपीचा शोध घेतला असता ते मिळुन आल्याने त्यांना गुन्हयात अटक केली आहे.
सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, नंदीनी वग्याणी यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस. पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने, तपास पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक समीर कदम, विश्वास भाबड, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार अवधुत जमदाडे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, सचिन सरपाले, शैलेश साठे, नामदेव रेणुसे, चेतन गोरे, महेश बारवकर, हनमंत मासाळ, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, निलेश जमदाडे, निलेश खैरमोडे, विक्रम सावंत, सागर कोंडे यांच्या पथकाने केली आहे.
