महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (नाईपर जेईई) या भारत सरकारच्या राष्ट्रिय स्पर्धा परीक्षेत आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) महाविद्यालयाचे बारा विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
दरवर्षी ही परीक्षा नाईपर या संस्थेमध्ये फार्मसी पदव्यूत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी घेतली जाते. फार्मसी शिक्षणाची सर्वोत्तम राष्ट्रीय संस्था म्हणून ओळखली जाणाऱ्या या संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी महाविद्यालयातील १२ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
या परीक्षेत शिवराज जाधव याने देशभरातून ३२८ वा (एमएस/एम. फॉर्म) व (एम. टेक) ८५ वा क्रमांक पटकावला आहे. तसेच भावना चौधरी, रुतुजा तरल, यश कुलकर्णी, शुभम यादव, निखिल एखंडे, रोहित राठोड, चैताली पर्वत, प्राची गोरे, स्नेहल सावळे, वरून पाटील आणि कृष्णा लाड या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. महाविद्यालयातील चार वर्षातील शिक्षण आणि प्रा. पवनकुमार वानखडे यांच्या मार्गदर्शनामुळे यश प्राप्त झाले असे मनोगत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
या यशाबद्दल संस्थेचे संचालक रियर ॲडमिरल अमित विक्रम (नि.) आणि प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. संस्थेचे विश्वस्त तेजस पाटील यांनी विद्यार्थ्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
