महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : ऑनलाईन माध्यमाव्दारे अज्ञात मोबाईल धारकाने पार्टटाईम जॉबचे अमिष दाखवुन टास्कच्या बदल्यात कमिशन देण्याच्या बहाण्याने बहाण्याने आर्थिक फसवणुक केल्याची घटना घोरपडी येथे घडली आहे.
मुंढवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनोळखी ने मोबाईल वरून ४० वर्षीय फिर्यादीशी संपर्क साधला व त्यांना टास्कच्या बदल्यात कमिशन देण्याचे आमिष दाखवले. वेगवेगळे टास्क देऊन बँक खात्यात २३,९५,५० हजार रुपये भरण्यास भागपडले व आर्थिक फसवणुक केली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) बाळासाहेब निकम तपास करीत आहेत.
