महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : ओटीपी किंवा मेसेज न येताच बँक खात्यावरील ५ लाख रुपये गायब झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पुष्पक दासगुप्ता (वय ५२, रा. धानोरी) यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी हे त्यांच्या ऑफिसमध्ये असताना त्यांच्या खात्यातून पैसे डेबिट झाल्याचे एकामागून एक असे ३ मेसेज आले. त्यांच्या खात्यातून ४ लाख ९५ हजार रुपये परस्पर ट्रान्सफर झाले. हा प्रकार त्यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ तक्रार केली.
संबंधित बँक मॅनेजर यांच्याशी संवाद साधला. पुष्पक दासगुप्ता हे पुण्यात एका खासगी कंपनीमध्ये काम करतात. त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी पीएफ फंडातील पैसे काढले होते. पुढील महिन्यात मुलाचे अॅडमिशन घ्यायचे असल्याने त्यांनी ते पैसे त्यांच्या नेहमीच्या वापरातील खात्यात न ठेवता वेगळ्या खात्यात ठेवले होते.
त्यातून ते ऑनलाइन व्यवहारही करत नव्हते. तसेच त्यांनी कोणत्याही लिंकवर क्लिक केले नाही, एकही ओटीपीची आला नाही तरीही त्यांचे खाते रिकामे झाले होते.
