महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे सातारा रोडवरील कात्रजकडे येणाऱ्या रोडवर कात्रज येथील जुना बोगद्यामध्ये भरधाव कारच्या धडकेने एक जण ठार झाल्याची घटना ११ जुलै रोजी रात्री घडली आहे.
भारती विद्यापीठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात नितीन मालोजी शिंदे (वय ४५, रा. मुंबई) यांचा मृत्यू झाला आहे. रात्री ९:१५ सुमारास हा अपघात झाला. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली.
रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी अपघात ठिकाणी धाव घेतली व वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर चालक मदत न करता पळून गेला आहे. पोलीस उप निरीक्षक मोहन देशमुख तपास करीत आहेत.
