बंडगार्डन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : फोनवर बोलत उभ्या असलेल्या तरुणाचा 20 हजाराचा मोबाईल दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावल्याची घटना पुणे स्टेशन परिसरात घडली आहे.
या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना शुक्रवारी पहाटे ५: ३० च्या सुमारास घडली आहे. फिर्याद तरुण अभिषेक अजय गायकवाड (वय २६, रा. ताडी वाला रोड,) याने दिली आहे. दुचाकीवर भरधाव आलेल्या दोन तरुणांनी त्याचा मोबाईल हीसकावून पळ काढला. हा तपास पोलीस उपनिरीक्षक राम गावडे करीत आहेत.