फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : भांडणाच्या रागातून जीवे मारण्याच्या उद्देशाने पतीने पत्नीच्या डोळ्यात चाकू खुपसल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात पती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
देवराज अल्लाबक्षी राठोड (वय २३) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रुमकी कमल शेख (२८, रा. नवीन सागर बिल्डिंग, बुधवार पेठ) हिच्याशी शनिवारी दुपारी नवरा कमल शेख याचे जोरदार भांडण झाले.
या भांडणाचा राग मनात धरत कमल याने रुमकीच्या डोळ्यात चाकू खुपसला. या हल्ल्यात रुमकी गंभीर जखमी झाली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रमिला शेंडगे करत आहेत.















