हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या माध्यमातून भरपुर नफा मिळेल, असे सांगून हडपसरमध्ये एकाची २० लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे.
हडपसर पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अनोळखी मोबाईल धारक व्यक्तीने फिर्यादी तरुणाशी मोबाईलवर टीपी ग्लोबल मार्केट मधून बोलत असल्याचे भासवले.
शेअर बाजारात गुंतवणूक केली तर दर महिना १० टक्के नफा मिळेल, असे आमिष दाखविले. त्याला भुलून फिर्यादी यांनी वेळोवेळी गुंतवणूक केली मात्र नफा मिळाला नाही. अखेर वाट पाहून त्यांनी पोलीसात तक्रार दाखल केली आहे. हा तपास पोलीस निरीक्षक मंगल मोढवे करीत आहेत.
