प्रवाशाला तिकिटाच्या दुप्पट दंड
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) तीन किंवा त्याहून अधिक वेळा धावत्या बसमध्ये प्रवाशांना तिकीट न देण्याच्या प्रकरणात प्रवाशांच्याबरोबर वाहकांवरही चौकशी करून कारवाई केली जाणार आहे.
पुणे विभागातील १४ आगारांतून तिकीट न घेता प्रवास करणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी आहे. मात्र, बसमध्ये काही प्रवासी गर्दीचा फायदा घेऊन जाणीवपूर्वक तिकीट काढण्याचे टाळतात. गर्दीचा फायदा घेत वाहक पैसे घेतात, पण प्रवाशांना तिकीट देत नाहीत, प्रवासी संख्या आणि अंतर यावर दुप्पट दर आकराले जातात.
विनातिकीट प्रवासी आढळल्यास प्रवाशाला २०० रुपये व तिकिटाच्या दुप्पट दंड आकारला जातो. किती अंतरावर प्रवास केला आणि जर तिकीट ४०० रुपये असेल तर दुप्पट दंड ८०० रुपये अधिक ४०० रूपये असे १२०० रूपये दंड आकारला जातो.
एसटीमध्ये प्रवाशांकडून अनेकदा गर्दीचा फायदा घेत वाहक पैसे घेतात, पण प्रवाशांना तिकीट देत नाहीत. त्यामुळे वाहकांवरही कारवाई करावी अशी संघटनेकडून मागणी केली जाते. एसटीत विविध योजनांमुळे प्रवाशांची संख्या वाढली आहे.
पुर्ण विभागातून १४ आगारामधून महिन्याला विनातिकीट प्रवासाची २५ ते ३० प्रकरणे घडतात. जवळपास सहा महिन्यांत १५० प्रकरणे झाली असल्याचे अधिकायांनी सांगितले. बसमध्ये तुरळक प्रवासी गर्दीचा फायदा घेऊन जाणीवपूर्वक तिकीट घेणे टाळतात.
अशा प्रकरणात वाहकांनीही दुर्लक्ष केले अथवा प्रवाशांना जाणीवपूर्वक तिकीट देणे टाळले आणि भरारी पथकाला सापडले तर वाहकांवर व प्रवास्यानवर कारवाई होणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) देण्यात आली आहे.
