वर्धमान प्रतिष्ठान : पद्मश्री आचार्य श्री चंदनाजी यांच्या सानिध्यात उपक्रम
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : पद्मश्री आचार्य श्री चंदनाजी यांच्या सानिध्यात शिवाजीनगर भागातील वर्धमान प्रतिष्ठान येथे जेष्ठ उद्योगपती फोर्स मोटर्सचे चेअरमन डॉ. अभय फिरोदिया व प्रवीण मसाले समुहाचे प्रमुख राजकुमार चोरडीया यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आंतराष्ट्रीय संस्था वीरायतन या संस्थे अंतर्गत देश -विदेशात शिक्षण घेणारे विद्यार्थी नागरीकांशी संवाद साधणार आहेत.
१९७२ साली पद्मश्री आचार्य श्री चंदनाजी यांनी वीरायतन या संस्थेची स्थापन करून जाती, धर्म, पंथ, भेदभाव सर्व गोष्टीला छेद देत मानवसेवेचे अविरत कार्य सुरु केले. बिहार सारख्या मागसलेल्या राज्यात देखील जनतेला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे व त्यांच्या संपूर्ण कुंटूबाचे आयुष्य बदलण्याचे कार्य त्यांनी सुरु केले.
यामुळे हजारो कुंटूबाच्या आयुष्यात अमुलाग्र बद्ल झाले आहेत. शिक्षणाच्या या गंगेसोबतच त्यांनी नागरीकांच्या आरोग्याकडे देखील लक्ष दिले. वीरायतन संस्थेच्या माधमातून आता पर्यंत 4 लाख लोकांच्या डोळ्यांचे ऑपरेशन त्यांनी करून दिले आहेत.
त्याहून अधिक पुढचे पाऊल टाकत संस्थे मार्फत काही ऑब्युलन्स प्रत्येक खेड्या पाड्यात जाऊन नागरीकांना आरोग्याच्या सुविधा पुरवत आहेत. त्यांच्या या भगीरथ कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना सर्वोच्च पद्मश्री सन्मानाने गौरवले आहे.
जैन समाजाच्या सहयोगाने चालत असलेल्या या संस्थेच्या मार्फत सहयोग घेऊन शिकत असलेले २० विद्यार्थी व ९ शिक्षक हे ११ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता वर्धमान प्रतिष्ठान शिवाजीनगर येथे नागरीकांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वर्धमान प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास राठोड, सेक्रेटरी जितु तातेड यांनी केले आहे.
सुमारे १० ठिकाणी वीरायतनच्या माध्यमातून शिक्षणाची ही अविरत गंगा वाहत आहे. त्यामध्ये राजगीर, पावापुरी, लछवाड, कच्छ, रुद्रानी, जखनिया, पालीताना ओसीयाजी, साचोर व नेपाल या ठिकाणी सुमारे १० हजारहून अधिक गरजू विद्यार्थांना शिक्षण दिले जाते.

















