महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
मुंबई : शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील दाव्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात बुधवारी होणारी सुनावणी येत्या १७ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली गेली आहे.
शिवसेना तसेच राष्ट्रवादी हे पक्ष आणि या चिन्हांच्या दाव्याचा खटला प्रलंबित आहे. न्यायालयाने याआधी दिलेल्या तारखांनुसार राष्ट्रवादीशीसंबंधित प्रकरणाची सुनावणी मंगळवारी तर शिवसेनेशी संबंधित प्रकरणाची सुनावणी बुधवारी होणार होती.
मात्र शिवसेनेशी संबंधित प्रकरणाची सुनावणी १७ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली गेली आहे. राष्ट्रवादीच्या दोन प्रकरणांची सूची कामकाज यादीत ४५ व्या क्रमांकावर आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण प्रलंबित आहे. पक्षाचे महाराष्ट्र आणि नागालँडमधील प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने एकत्रित केलेले आहे.