महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : आनंद दरबार दत्तनगर येथे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या हस्ते १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र स्वर्ण कन्या तथा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू तनिषा चोपडा, सिया शहा, राष्ट्रीय मल्लखांब खेळाडू लक्ष्मी वर्मा, राष्ट्रीय कराटे खेळाडू सोहम कदम यांचा खेळातील उत्कृष्ट योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी दत्तनगर येथील श्री चक्रधर स्वामी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर विविध गीतांचे सादरीकरण केले. आनंद दरबार परिसर आकर्षित रांगोळी व तिरंगे ध्वज पताके देशभक्तीपर गीतांनी दुमदुमून निघाला. या कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख पाहुणे उद्योजक मारुती बेलदरे, उद्योगपती ईश्वर फाले, उद्योगपती राजाराम ढमाले, श्री चक्रधर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महेंद्र कोंढरे उपस्थित होते.
उपस्थित विद्यार्थी व मान्यवरांचे स्वागत आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी केले.यावेळी आनंद दरबारचे सर्व सभासद विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आनंद दरबार दत्तनगर च्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
