महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : गोपाळकाल्या निमित्त एकूण ११ मंडळांनी दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम व स्पर्धा ठेवली आहे. मंगळवारी (ता.२७) पाच ठिकाणी, बुधवारी (ता.२८) चार ठिकाणी शुक्रवारी (ता.३०) एक व रविवारी (ता.१ सप्टेंबर) एका ठिकाणी दहीहंडी फोडण्यात येणार आहे. दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकाचे तीन थर करण्यात येणार आहेत.
बेकायदा डीजे लावून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मंडळावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. प्रत्येक मंडळासाठी पाच पोलिस व पाच होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. शिवाय पोलिस अधिकाऱ्यांचे फिरते पथक दही हंडी मंडळ व गोविंदावर नजर ठेवणार आहे.
मंगळवारी सायंकाळी सहा नंतर शहरातील गडकोट प्रतिष्ठान शिवाजी कॉलेज रोड, महाद्वार चौकातील अंबिका देवस्थान, मावळा ग्रुप संभाजी चौक, जय शिवराय मित्र मंडळ बगले चाळ सोलापूर रोड, दोस्ती ग्रुप खुरपे बोळ तेल गिरणी चौक या पाच ठिकाणी प्रत्येकी तीन थर लावून गोविंदा पथकाकडून दही हंडी फोडण्यात येईल.