सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला मारहाण केल्याची घटना सहकारनगर भागात घडली असून, पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण करण्यात आली.
या प्रकरणी २४ वर्षीय पत्नीने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता तळजाई वसाहत, पद्मावती परिसरात घडली.
या प्रकारात पत्नी बेशुद्ध पडली हे पाहून, तिला घरात टाकून कडी लावून तो पसार झाला. हा तपास महिला पोलिस उपनिरीक्षक कल्पना काळे करत आहेत.

















