वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे : राजाराम पुलाजवळ असलेल्या पद्मावती मंदिराकडे जात असताना एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली आहे. वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ६५ वर्षांची आहे. ती मंदिराकडे पायी जात असताना, दुचाकीवरून आलेल्या एका तरुणाने तिच्या गळ्यातील ७५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले.















