शिवसेना उबाठा दहीहंडी उत्सव उन्नतीनगरमध्ये जल्लोषात साजरा, विविध पक्षीय नेते सहभागी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उन्नतीनगर गाडीतळ येथे भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. महिलांच्या नृत्याची पर्वणी, गोपाल भक्तांचा उत्साह यामुळे दहीहंडी जल्लोषात साजरी झाली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख दत्ताभाऊ खवळे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित दहीहंडीमध्ये कसबा पेठेतील गोविंदा पथकाने हंडी फोडत तीन लाख रुपयांची रोख रक्कम व सन्मानचिन्ह पटकावले. सिनेअभिनेत्री शीतल ढेकळे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरल्या.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी नगरसेवक मारुती आबा तुपे, योगेश ससाणे, नितीन गावडे, राष्ट्रवादी काँग्रेस हडपसर अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे, माजी सरपंच संजय हरपळे, विजय भिंताडे, राम बोरकर, सतीश जगताप, पल्लवी प्रशांत सुरसे, शीतल संजय शिंदे, गोपीनाथ पवार, विशाल मिरेकर, विद्या संतोष होडे, संजय सपकाळ, आजिनाथ भोईटे, इम्रान शेख, किरण गाडेकर, संजय डोंगरे, डॉ. बच्चूसिंग टाक, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दहीहंडी उत्सवाचे आयोजन विभागप्रमुख दत्ताभाऊ खवळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शाखाप्रमुख अनिकेत सपकाळ, उपशाखाप्रमुख कुणाल वाघ, जितू आप्पा कदम, अनिल हावळे, शुभम जाधव, उपशाखाप्रमुख सुरेश दोरी व कार्यकर्त्यांनी केले. माजी महापौर प्रशांत जगताप यांनी कडव्या शिवसैनिक दत्ताभाऊ खवळे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
