पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने आयोजन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित ‘शाळा सुरक्षा परिषदेला’ शहरातील शाळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शाळा सुरक्षा परिषद कार्यक्रमासाठी पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील सुमारे १२०० शाळांमधील सुमारे २४०० मुख्याध्यापक आणि सचिव सहभागी झाले होते.
बदलापूरमधील अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने पुणे शहरातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, सचिव यांची श्री गणेश कला क्रिडा मंच, स्वारगेट येथे ‘शाळा सुरक्षा परिषद’ पुणे पोलिस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती.
या शाळा सुरक्षा परिषद कार्यक्रमास पोलिस उपआयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर, निखील पिंगळे यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात पीपीटीद्वारे सादरीकरण करून महिला व बालकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने नवीन कायद्यांची माहिती व त्या अनुषंगाने पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत धालू असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.
तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी रस्ता सुरक्षेसंबंधी सविस्तर माहिती देऊन स्कूल बस धोरण समजावून सांगितले. त्यानंतर संपत सूर्यवंशी, संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य यांनी वेळोवेळी शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णय व परिपत्रक यांची अंमलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शन केले.
तसेच पोलिस सहआयुक्त, पुणे शहर, रंजनकुमार शर्मा यांनी कार्यक्रमाचा मुख्य उद्देश समजावून सांगून शाळेमध्ये घडणाऱ्या गैरप्रकारांविरुद्ध उपाययोजना बाबत मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे पोलिस आयुक्त, पुणे शहर, अमितेश कुमार यांनी सुमारे १२०० शाळांतील सुमारे ११ लाख विद्यार्थ्यांपर्यंत सदर परिषदेची माहिती पोहोचविण्याबाबत उपस्थितांना आवाहन केले तसेच विद्यार्थ्यांना स्कूल बस/रिक्षा यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची ने-आण न करण्याबाबत, शाळेच्या १०० यार्ड परिसरामध्ये पानटपरी नसावी, शाळेमध्ये सीसीटीव्ही बसवून ते सीसीटीव्ही फुटेज १५ दिवसांपर्यंत जतन करावे तसेच शाळेमध्ये कार्यरत सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची चारित्र्य पडताळणी करून घ्यावी, आदी सूचना केल्या.
शाळांच्या सुरक्षेसंबंधी कोणत्याही अडचणीसाठी पुणे पोलिस मदतीसाठी सदैव तत्पर राहील असे आश्वासन दिले. तसेच उपस्थित मुख्याध्यापक व संस्थेचे सचिव यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे निरसन पोलिस आयुक्तांनी केले.
शाळा सुरक्षा परिषद कार्यक्रमासाठी पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील सुमारे १२०० शाळांमधील सुमारे २४०० मुख्याध्यापक आणि सचिव सहभागी झाले होते. पोलीस आयुक्त, पुणे शहर, अमितेश कुमार;
पोलिस सहआयुक्त, पुणे शहर, रंजनकुमार शर्मा; संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य, संपत सूर्यवंशी; मा. शिक्षणाधिकारी (माध्यमिक), पुणे जिल्हा परिषद, पुणे डॉ. भाऊसाहेब कारेकर; अपर पोलिस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, मनोज पाटील;
अपर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, प्रविणकुमार पाटील; परिवहन अधिकारी, पुणे, अर्चना गायकवाड; पोलिस अधिक्षक, पुणे ग्रामीण, पंकज देशमुख; पोलिस उपआयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर, निखील पिंगळे;
पोलिस उपआयुक्त, परिमंडळ १, संदीपसिंह गिल; पोलिस उपआयुक्त, परिमंडळ २, स्मार्तना पाटील; पोलिस उपआयुक्त, परिमंडळ ३, संभाजी कदम; पोलिस उपआयुक्त, परिमंडळ ४, हिम्मत जाधव; पोलिस उपआयुक्त, परिमंडळ ५, आर. राजा; पोलिस उपआयुक्त, विशेष शाखा, पुणे शहर, जी. श्रीधर यांच्या बहुमूल्य सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.















