हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पत्नीसमवेत मोटार सायकलवर जात असताना दोन दुचाकीस्वारांनी गाडीला अडकवलेली दागिन्यांची पिशवी लंपास केली. त्या पिशवीत ४,९५,५०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व इतर महत्त्वाची कागदपत्रे होती.
याप्रकरणी मांजरी येथे राहणाऱ्या ६९ वर्षांच्या नागरिकाने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २९ ऑगस्ट रोजी दुपारी ३.४५ च्या सुमारास रोहित वडेवाले समोर, शेवाळवाडी पीएमपीएमएल बस डेपोच्या जवळ, पुणे-सोलापूर रोड, शेवाळवाडी, पुणे येथे फिर्यादी आणि त्यांची पत्नी एकत्र होते.
त्यावेळी फिर्यादींनी त्यांच्या मोटारसायकलच्या हँडलला अडकवलेल्या पिशवीत ठेवलेले ४,९५,५०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि इतर कागदपत्रे अज्ञात चोरट्याने चोरून नेली.
हा तपास पोलीस अंमलदार श्रीकांत पांडुळे करीत आहेत.















