सिंहगडरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : सिंहगड रस्ता परिसरात झालेल्या अपघातात पादचारी महिलेचा मृत्यू झाला.
ही घटना सिंहगड रस्ता भागात २४ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास गणेश मळा परिसरात घडली. पादचारी महिलेला हॉटेल आशाजवळ भरधाव वाहनाने धडक दिली. या अपघातानंतर घटनास्थळी न थांबता वाहनचालक पसार झाला. गंभीर जखमी झाल्याने महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
संगीता सिद्धराम धुळे (वय ५०, रा. वडगाव बुद्रुक) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी वाहनचालकाविरुद्ध सिंहगडरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या मुलगा समर्थ धुळे याने सिंहगडरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल नामदे करत आहेत.















