स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : सुर्यमुखी दत्त मंदिराजवळ पी. टी. कॉलनी गेट समोर सॅलेसबरी पार्क येथून पायी जात असताना एका महिलेचे मंगळसूत्र हिसका मारून चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना घडली आहे.
याबाबत ६० वर्षांच्या महिलेने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्या सुर्यमुखी दत्त मंदिरात जात असताना ही घटना घडली आहे.
दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसका मारून तोडून पळून गेले. पोलीस उपनिरीक्षक संतोष तानावडे तपास करीत आहेत.
