विश्रांतवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : धानोरी येथील पायी जाणाऱ्या तरुणाचा मोबाईल दुचाकी वरून आलेल्या तरुणानीं पळवल्याची घटना घडली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना शनिवारी (दि. ७ सप्टेंबर) मध्यरात्री घडली आहे.या प्रकरणी लोहगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी तरुण मुंजाबा वस्तीवरील रहिवासी आहे.
तो रात्रीच्या वेळेस धनेश्वर शाळे जव ळून पायी जात असताना दुचाकी वरून आलेल्या तरुणांनी फिर्यादी यांचा महागडा मोबाईल जबरदस्तीने पळवला. पोलिसांनी तपास करून अर्जुन नामदेव राठोड (वय १९. रा. लोहगाव) यास अटक केली आहे. पोलिस उप निरीक्षक नितीन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.
