शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शिवाजीनगर मेट्रो स्टेशनवर आंबेगाव येथील एका तरुणाला चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी तीन अनोळखी तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव येथील तरुण बुधवारी (दि. ११) दुपारी दीडच्या सुमारास आपल्या मित्रासोबत स्टेशनवर बोलत उभा असताना, तिघांनी त्याला चाकूचा धाक दाखवला.
त्यानंतर त्याला ऑनलाइन माध्यमातून रक्कम ट्रान्सफर करण्यास भाग पाडले आणि त्याच्याकडून मनगटी घड्याळ असा एकूण ७,४९९ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अजित बडे करीत आहेत.
