स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पैसे काढण्याच्या बहाण्याने एटीएम कार्ड बदलून एका व्यक्तीचे ५० हजार रुपये काढून फसवणूक करण्याचा प्रकार टिळकरोड येथे घडला आहे.
या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ०२ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. भारतीय स्टेट बँकेचे एटीएम मशीन टिळकरोड, पुणे येथे आहे.
फिर्यादीला अनोळखी व्यक्तीने पैसे काढून देतो, असे सांगून त्यांचे एटीएम कार्ड घेतले आणि पिन नंबर मागून घेतला. फिर्यादींच्या एटीएममधून पैसे निघत नाहीत, असे सांगून त्या व्यक्तीने “तुमचे एटीएम घ्या आणि दुसऱ्या एटीएममध्ये जाऊन पहा,” असे सांगितले.
हातचलाखीने फिर्यादीचे एटीएम कार्ड आणि पिन नंबर घेऊन त्या बदल्यात त्यांना दुसरे एटीएम कार्ड दिले. नंतर फिर्यादींच्या एटीएम कार्डद्वारे बँक खात्यातून ५०,०००/- रुपये काढून फसवणूक केली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक बी. पी. शिरसट करत आहेत.
