वानवडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : ऑनलाईन माध्यमातून स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीतून नफ्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करण्याची घटना उघडकीस आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १९ जुलै ते २९ ऑगस्ट या कालावधीत घडली आहे. या प्रकरणी वानवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादींना अनोळखी व्यक्तीने मोबाईलवर संपर्क साधला.
शेअर ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. फिर्यादींनी जेंव्हा पैसे काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा वेगवेगळ्या कारणांनी रक्कम परत देण्याचे टाळले गेले आणि त्यांची एकूण ३१,००,०००/- रकमेची फसवणूक झाली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) गोविंद जाधव करत आहेत.
