चतुःश्रृंगी पोलीसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : खुनाचा प्रयत्न केल्यानंतर फरार झालेल्या दोन आरोपींना दीड वर्षानंतर पकडण्यात चतुःश्रृंगी पोलीस व दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाला यश आले आहे.
या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यात दीड वर्षांपासून फरार असलेले आरोपी १) हरीश उर्फ हरी रविंद्र सावळे (वय २३ वर्षे, रा. ब्लुबेल सोसायटी शेजारील आकाश रणपिसे यांची पत्र्याची चाळ, जयहिंद चौक, सुतारवाडी, पाषाण) आणि २) सनी राजेश गुजराती (वय २२ वर्षे, रा. मुळपत्ता- खड्डा झोपडपट्टी, शिवाजीनगर, पुणे व सध्या रा. दत्तकृपा वॉशिंग सेंटर शेजारी, दांगट चाळ, सुतारवाडी, पाषाण) यांचा शोध दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक घेत होते.
गुन्हे शाखा, पुणे शहरातील सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे व हवालदार प्रदीप राठोड, बाळु गायकवाड, गणेश ढगे, अमंलदार अमित गद्रे, महेश पाटील व साईकुमार कारके गस्तीवर होते.
स्टाफमधील पोलीस अमंलदार अमित गद्रे यांना गुन्ह्यातील फरार आरोपी हरीश उर्फ हरी रविंद्र सावळे हा ओंकारेश्वर मंदिराजवळ मुठा नदीपात्रात, डेक्कन आणि सनी राजेश गुजराती हा दांगट वॉशिंग सेंटर, पाषाण येथे येणार असल्याबाबत गुप्त माहिती मिळाली.
त्यानुसार, वरिष्ठांच्या आदेशानुसार प्रविण काळुखे व स्टाफने सापळा रचून दीड वर्षांपासून फरार असलेले आरोपी हरीश उर्फ हरी रविंद्र सावळे आणि सनी राजेश गुजराती यांना शिताफीने पकडून ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे चौकशी करता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. सदर आरोपींना पुढील कारवाईसाठी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक, नंदकुमार बिडवई यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलीस अमंलदार अमित गद्रे, पोलीस हवालदार बाळु गायकवाड, प्रदीप राठोड, धनंजय ताजणे, गणेश ढगे, अजित शिंदे, गणेश गोसावी, महेश पाटील, साईकुमार कारके, रविंद्र लोखंडे, श्रीकांत दगडे, शिवाजी सातपुते, नारायण बनकर, मनिषा पुकाळे यांनी केली आहे.















