कोंढवा पोलिसांनी केली तीन आरोपींना अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुणीचे मोटारीतून अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
या संदर्भात एका तरुणीने कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. या प्रकरणात मोटारचालक राजेखाँ करीम पठाण (वय ३६, रा. कोंढवा) याला अटक करण्यात आली आहे. तक्रारदार तरुणी तिच्या मित्रासोबत बोपदेव घाटात रात्री ११ च्या दरम्यान फिरायला गेली होती.
त्यावेळी तीनजण तिथे आले पठाण मोटारीतून तेथे आला. त्याने मानवाधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे खोटे सांगितले. या ठिकाणी जोडप्यांना बंदी असल्याचे सांगून त्याने तरुणी आणि तिच्या मित्राचे मोबाइलवर छायाचित्र घेतले.
तरुणीला धमकावून त्याने तिला मोटारीत बसण्यास भाग पाडले. त्यानंतर येवलेवाडी परीसरात मोटार नेली आणि तेथील एका गल्लीत मोटार थांबवून तरुणीवर तिघांनी बलात्कार केला. त्यानंतर तरुणीला खडी मशीन चौकात सोडून पठाण पसार झाला.
पोलिसांनी तातडीने तपास करून आरोपीची ओळख पटवली आणि त्याच्यासह तिघांना अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शबाना शैख तपास करीत आहेत.

